अर्जेंटिना, २६ नोव्हेंबर २०२०: अर्जेंटिनाचे महान फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे बुधवारी निधन झाले. अर्जेंटिनाच्या माध्यमांनुसार, मॅराडोना यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मॅराडोना बराच काळापासून आजारी होते.
दोन आठवड्यांपूर्वी मेंदूतील गाठींमुळे त्यांची शस्त्रक्रिया करावी लागली. मॅराडोना यांच्या मृत्यूनंतर जगभरातून त्यांच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, ‘माझा हिरो काळामध्ये विलीन झाला आहे. त्यांच्यासाठीच मी फुटबॉल पाहिला.’
डिएगो मॅराडोनाला आतापर्यंतचा महान फुटबॉलपटू म्हटले जाते. १९८६ च्या अर्जेटिनाला फुटबॉल विश्वचषक जिंकण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. १९७६ मध्ये मॅराडोना यांनी फुटबॉलच्या जगात प्रवेश केला. एक दशक नंतर, अर्जेन्टिनाने त्यांच्या नेतृत्वात १९८६ विश्वचषक जिंकला. यावेळी त्यांनी खेळाच्या इतिहासात दोन अविस्मरणीय गोल देखील केले.
या खेळाडूचे मोठेपण या गोष्टीवरून ओळखले जाऊ शकते की, त्यांचा देश अर्जेंटिना मध्ये ब्यूनस आयर्स मध्ये ९ फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे. डिएगो मॅराडोना यांचा ५८ वा वाढदिवस साजरा करीत २०१८ मध्ये त्यांच्या प्रथम कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे