मोदी सरकारच्या कामगार-विरोधी धोरणांच्या विरोधात देशव्यापी संपात महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियनचा सर्व शक्तिनिशी सहभाग!

पुणे , दि. २६ नोव्हेंबर २०२० : महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियनच्या सर्व कामगारांनी आजच्या देशव्यापी संपामध्ये सक्रीय सहभाग घेतला. पुण्यातील अप्पर डेपो व दत्तनगर येथील मजूर नाक्यांवर युनियनने मोदी सरकारने कामगार कायद्यांमध्ये केलेले बदल, व मोदी सरकारच्या फॅसिस्ट धोरणांमुळे सुसाट वेगाने वाढत असलेले खाजगीकरण व बेरोजगारी, आणि संपाच्या इतर मागण्यांवर निषेध सभा आयोजित केली होती. ह्या निषेध सभेत युनियन संयोजन समितीच्या सदस्यांनी संपाचे राजकीय महत्त्व विशद केले व ह्या संपातील मागण्या विस्तृत रूपाने मांडल्या.

लॉकडाउनमुळे आलेल्या भीषण संकटामुळे व त्यात सरकारने व मालकवर्गाने दिलेल्या अमानुष वागणुकीमुळे कामगारांच्यात पसरलेल्या हताशा-निराशा आणि निर्बळतेच्या भावनेचे मळभ ह्या संपाने दूर केले व कामगारांच्या एकजुटीच्या ताकदीची जाणीव ह्या संपाने करून दिली.

सर्व कामगारांनी एक-दिवसीय लाक्षणिक संपाच्या पुढे जाऊन भांडवलशाही व तिचे सर्वात नग्न रूप असणार्‍या फॅसिझमच्या विरोधात संघटित होऊन झुंजारपणे निरंतर संघर्ष करण्याचा निर्धार ह्या वेळी करण्यात आला .

न्युज अनकट प्रतिनिधी :- ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा