नवी दिल्ली, २७ नोव्हेंबर २०२०: सध्याची कोरोना परिस्थिती अनेक राज्यांमध्ये हाताबाहेर गेल्याचे दिसून आले आहे. संपूर्ण भारतात पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात फोफवण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशातील अनेक राज्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेचा हाहाकार पहायला मिळतोय.
कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भाव लक्षात घेता, सुप्रीम कोर्ट देखील चांगलेच चिंतेत आहे. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रासह अन्य राज्यांना सद्य स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तर गुजरातमध्ये कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेली आसून अधिक खराब झाल्याचे ही कोर्टाने म्हटलंय. दिल्ली मधे नोव्हेंबरमधे परिस्थिती बिकट झाली. प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या याचा अहवाल सरकारनं दाखल करावा, असे निर्देश न्यायालयानं महाधिवक्ता संजय जैन यांना दिले.
राज्याची चिंता वाढली…..
राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आसून एक चिंतेची बाब बनली आहे. महाराष्ट्रात २६ तारखेला ६४०६ नवीन कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत. त्या आधीच्या दिवशी म्हणजेच २५ तारखेला ही पाच हजारच्या घरात होती. तर २६ तारखेला ६५ जणांचा मृत्यू झाला. वाढत्या कोरोना रूग्णांमुळे राज्यातील एकूण संख्या १८,०२,३६५ वर गेली. तर आत्तापर्यंत ४६,८१३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच राज्यात आतापर्यंत १६,६८,५३८ रूग्णांनी कोरोनावर मात केली आसून ८५,९६३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
देशातील कोरोना स्थिती १ कोटी रूग्णांच्या उंबरठ्यावर…..
भारतात गेल्या २४ तासात ४४,८८९ नवीन कोरोना रूग्णांची भर पडली आसून ५२४ जणांचा मृत्यू झाला. ज्यामुळे देशातील एकूण कोरोना रूग्णांची संख्या ९२,६६,७०६ वर गेली आहे. तर एकूण १,३५,२२३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात ४,५२,३४४ ॲक्टीव रूग्ण आसून गेल्या २४ तासात ३६,३६७ जणं कोरोना मुक्त झाले आहेत. ज्यामुळे ८६,७९,१३८ एकूण कोरोनामुक्त रूग्णांचा आकडा आहे.
२०२० पेक्षा २०२१ महाभयंकर……
कोरोना व्हायरस मुळे जगाची तशीही पुरती वाट लागली आहे आणि त्यात संपूर्ण जगाच्या नजरा या २०२१ कडे लागल्या आहेत. २०२० हे कधी संपेल आणि २०२१ चा नवा सूर्य कधी उगवेल याची लोक वाट पाहत आसतानाच आजून एक धोक्याची घंटा वाजली आहे. संयुक्त राष्ट्राच्या फुड प्रोग्राम संस्थेनुसार २०२० काही इतके गंभीर नसुन २०२१ हा महाभयंकर आसल्याचा दावा केला आहे. २०२१ मधे उपासमारीची गंभीर समस्या उद्भवू शकते व तसेच ३६ देशांमधे दुष्काळ पडू शकतो आणि जागतिक मंदीची दुसरी लाटही पुढच्या वर्षी येऊ शकते आसे सांगण्यात आले आहे. तर २०२० च्या एप्रिल पर्यंत १३.५ कोटी लोक हे भुकेले होते तर २०२१ मधे हा आकडा आणखी गंभीर होण्याचा इशारा या संस्थे कडून देण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव