तर गांगुलीचे अध्यक्षपद तीन वर्ष?

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व सध्याचा बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली या अध्यक्षपदावर किती काळ राहणार याविषयी सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
गांगुली या पदावर फक्त १० महिन्यांच्या कालावधीसाठी असल्याच्या चर्चा सुरु असतानाच तो या पदावर ३ वर्ष राहू शकतो अशीही शक्यता निर्माण झाली आहे.
याबाबत अधिक माहिती घेतली असता, बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा १ डिसेंबरला होणार आहे. त्यात १२ मुद्यांसाठी घटनादुरुस्ती करण्यात येणार आहे.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दोन टर्म काम पाहिल्यानंतर कुलींग ऑफ वेळ पूर्ण केल्यानंतर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा नियम आहे.
नव्या प्रस्तावानुसार अध्यक्ष आणि सचिव यांना हा नियम लागू राहू नये, अशी सुचना करण्यात आली आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास बीसीसीआय अध्यक्ष गांगुली आणि सचिव जय शाह यांचा कार्यकाळ ३ वर्षांसाठी राहिल.
दरम्यान, गांगुलीचा कार्यकाळ वाढण्याविषयीच्या शक्यतेवरून अनेक क्रिकेट चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा