ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत वनडे सामन्यात भारताची खराब सुरवात, ०-१ ने पिछाडीवर…..

सिडनी, २८ नोव्हेंबर २०२०: तब्बल आठ महिन्या नंतर वनडे चा सामना खेळण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभावाचा सामना करावा लागला. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर असून तीन वनडे सामन्याची मालिका सुरू झाली. ज्याचा पहिला सामना २७ तारखेला ऑस्ट्रेलिया मधे प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगला.

सिडनीमध्ये झालेल्या पहिल्या वनडेमध्ये भारतीय टीम चा ६६ रनने पराभव झाला. भारताच्या खराब बॉलिंग आणि फिल्डिंगमुळे ऑस्ट्रेलियाने ५० ओव्हरमध्ये ३७४ रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला ५० ओव्हरमध्ये फक्त ३०८ रनच करता आले, त्यामुळे भारत तीन मॅचच्या सीरिजमध्ये १-० ने पिछाडीवर गेला.

या पराभवानंतर कॅप्टन विराट हा नाराज झाल्याचे दृश्य दिसले. त्याने मैदानामध्येच खेळाडूंची शाळाही घेतली. मॅचनंतर विराटने टीमच्या खेळाडूंबाबतच काही प्रश्न उपस्थित केले. ‘२५ ओव्हरनंतर भारतीय खेळाडूंची शारिरिक भाषा खूपच निराशाजनक होती. आम्हाला तयारी करायला पूर्ण वेळ मिळाला होता. पराभवाचं कोणतंही कारण देऊ इच्छित नाही, पण आम्ही बऱ्याच काळानंतर वनडे क्रिकेट खेळत आहोत. याआधी आम्ही टी-२० क्रिकेट खेळत होतो. चांगल्या टीमविरुद्ध तुम्ही मिळालेल्या संधीचं सोनं केलं नाहीत, तर त्याचे परिणाम भोगावे लागतात,’ असं विराट म्हणाला. सिडनी वनडेमध्ये शिखर धवन आणि हार्दिक पांड्या यांनी सोप्या संधी सोडल्या, तर खेळाडूंची मैदानातली फिल्डिंगही खराब झाली.

मयंक अग्रवाल आणि विराट कोहली यांनीही चुका केल्या, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने मोठा स्कोअर उभारला. आम्हाला सहाव्या बॉलरची कमी जाणवली. हार्दिक पांड्या बॉलिंगसाठी फिट नव्हता आणि आमच्याकडे ऑलराऊंडरचा दुसरा पर्यायही नव्हता. स्टॉयनिस आणि मॅक्सवेलसारखे खेळाडू आमच्याकडे नाहीत. बॅटिंग करताना आम्ही सकारात्मक होतो. बॅट्समनची कामगिरी चांगली झाली,’ असं वक्तव्य विराटने केलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा