मुंबई: शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी तळ्यात-मळ्यात असणाऱ्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीने पाठिंब्याचे पत्र न दिल्यामुळे राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत शिवसेना सरकार स्थापन करण्यास अपयशी ठरल्याने शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे.
मात्र, राज्यात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एकत्रित सरकार स्थापन होईल आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल, असा विश्वास काँग्रेस नेते आणि आमदार कागडा चांड्या पाडवी यांनी व्यक्त केला आहे. अशी महिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
कागडा चांड्या पाडवी यांनी म्हटले कि, सत्तास्थापनेची प्रक्रिया अद्याप सुरु असून, निकाल सकारात्मक असणार आहे. वैयक्तिकरित्या मला तिन्ही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतील आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, असे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढली. यामुळे शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णयही काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र मिळून घेतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली आहे.