बारामती, १२ डिसेंबर २०२०: बारामती प्रीमियर लीग पर्व २ रे या क्रिकेट स्पर्धेला फेब्रुवारी महिन्यात सुरवात होणार आहे. यंदाच्या मोसमात १२ संघांनी सहभाग नोंदवला असुन संघाच्या लिलावात उत्स्फूर्तपणे संघ मालक सहभागी झाले होते. यामध्ये डी.जी. शिंदे, सुखदेव हिवरकर, उत्तम धोत्रे, संदीप जाधव आणि दीपक कुदळे यांचा समावेश आहे. या वेळी ६८ हजारांची सर्वोच्च बोली लागली.
बारामती प्रीमियर लीग ही बारामती शहरात नावाजलेली स्पर्धा असुन तालुक्यातील क्रिकेट खेळाडूंना त्यांचं कौशल्य दाखविण्यासाठी संधी उपलब्ध करून देत आहे. यामुळं यंदाच्या मौसमात एकूण ३६१ खेळाडूंनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत या बारातमी प्रीमियर लीग पर्व- २ मध्ये अर्ज भरून नाव नोंदणी केली आहे.
खेळाडूंचा लिलाव पद्धतीनं १२ संघात प्रत्येकी १४ खेळाडू समाविष्ट करण्यात येणार आहे. खेळाडूंचा लिलाव हा येत्या २७ डिसेंबर (रविवार) रोजी होणार आहे. पसंतीचे खेळाडू हे संघ मालक लिलावात बोली लावून खेळाडू खरेदी करू शकतात त्यामुळं बारामती प्रीमियर लीग पर्व- २ ची उत्कंठा वाढू लागली आहे.
येणाऱ्या नवीन वर्षात बारामती प्रीमियर लीग बारामती शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम या मैदानावर होणार आहे. सामने युट्यूब लाईव्ह ही पाहता येणार आहेत, असं स्पर्धेचे मुख्य आयोजक अभिजित कांबळे, योगेश व्हटकर, रविंद्र(पप्पू)सोनवणे, सूरज अहिवळे आमराई बॉईज क्रीडा प्रतिष्ठान यांच्या मार्फत सांगण्यात आलं.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव