शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी सहाशे किलोमीटरचा केला पायी प्रवास

बारामती, १६ डिसेंबर २०२०: यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील जवळा गावापासून ६०० किलोमीटर तब्बल २२ दिवस चालत संजय देशमुख हे पायी प्रवास करत बारामती मध्ये दाखल झाले. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अमोल काटे यांनी देशमुख यांच्या विषयी माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सांगितल्यावर शरद पवार यांनी देशमुख यांना भेटण्यासाठी वेळ दिली. यानंतर देशमुख यांनी काल पुण्यातील मोदी बाग येथे संध्याकाळी पाच वाजता शरद पवारांची भेट घेतली.

पवार यांनी देशमुख यांच्याशी जवळपास दोन तास गप्पा मारल्या. यावेळी पवार यांनी संजय देशमुख त्यांच्या कौटुंबिक स्थिती, शेती ची माहिती, त्या परिसरातील सामाजिक व आर्थिक माहिती याविषयी आस्थेनं विचारपूस केली. यावेळी देशमुख यांना भरून आलं होतं.

पवार हे शेतकऱ्यांचा विठोबा म्हणून लहानपणापासून पवार साहेबांवर प्रेम करणारा शेतकरी देशमुख म्हणाले की, “माझ्या संपूर्ण आयुष्याएवढी पवार साहेबांची राजकीय सामाजिक कारकिर्द आहे, त्यांना जवळून पाहणं हेच माझं मोठं स्वप्न होतं. आम्ही त्यांना आमच्या शेतकऱ्यांचा विठोबा मानतो. ते मला भेटले यातच माझ्या आयुष्याचं सार्थक झालं”, असं देशमुख म्हणाले.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा