बारामती, १७ डिसेंबर २०२०: औरंगाबाद जिल्ह्यातील ता. पैठण थेरगावतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शासन करावं अन्यथा राज्यात तीव्र आंदोलन छेडलं जाईल असं निवेदन तहसीलदार विजय पाटील यांना माळी सेवा संघाकडून देण्यात आलं असल्याचं महिला आघाडीच्या अध्यक्ष स्वप्ना लोणकर यांनी सांगितलं.
औरंगाबाद येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना माणूसकीला काळीमा फासणारी असुन पीडित मुलीचे कुटुंब अत्यंत गरीब आहे. या घटनेमुळं कुटुंब पुर्णपणे हादरुन गेलं आहे. पिडीत मुलीला न्याय मिळावा, या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या दृष्टीनं हा खटला अंडर ट्रायल व फास्ट ट्रॅक कोर्टात दिशा कायद्यान्वये जलदगतीनं कामकाज करुन चालविण्यात यावा.
या प्रकरणात सरकारी वकील म्हणून ऍड. उज्वल निकम यांची नेमणूक करावी. अन्यथा माळी सेवा संघाचे संस्थापक दत्तात्रय माळी यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल यांची नोंद घ्यावी. असे लोणकर यांनी सांगितलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव