भोसलेवाडी मध्ये हातभट्टीवर कारवाई, पोलिसांनी हातभट्टीचे रसायन केले नष्ट

पुरंदर, १९ डिसेंबर २०२०: पुरंदर तालुक्यातील भोसलेवाडी गावांमधील हरिबावाडी पाझर तलावाच्या लगत असलेल्या हातभट्टी वर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाने धाड टाकून कारवाई केली आहे. यामध्ये गावठी हातभट्टीची दारू काढण्याचे रसायन नष्ट केले आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सोमेश राऊत यांनी अज्ञातांविरोधात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील भोसलेवाडी येथील एका पाझर तलावाच्या बाजूने एक हातभट्टी चालवली जात होती. या हातभट्टी मध्ये दारू काढण्यासाठीचे रसायन लावण्यात आले होते. त्याबाबतची माहिती गुप्त माहितीदाराद्वारे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांना मिळाली होती. यानंतर पाटील यांनी स्वतः याबाबत लक्ष घालून पथक नेमून या ठिकाणी कारवाई केली. याठिकाणी मिळून आलेले दारू काढण्यासाथीचे रसायन त्यांनी नष्ट केले.

काल दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. यामध्ये बारा हजार पाचशे रुपये किमतीचा लोखंडी भोपळा बॅलर पोलिसांना आढळून आला. त्यामध्ये सुमारे ५ हजार लिटर गावठी दारू बनवण्यासाठीचे रसायन लावन्यात आले होते. यातील काही सॅम्पल काढून बाकी सर्व रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे. पोलीस कॉन्स्टेबल सोमेश राऊत यांनी याबाबतची फिर्याद सरकारच्यावतीने दिली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा