पुरंदरमधील कुंभारवळणच्या शिक्षिकेसह मुलांनी साधला थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद

पुरंदर, १९ डिसेंबर २०२०: महाराष्ट्र शासनाच्या महानेट फेज २ या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका शीतल खैरे-जाधव व त्यांचे विद्यार्थी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमाला संपूर्ण पुणे जिल्ह्यातून कुंभारवळण या एकमेव गावाची निवड करण्यात आली होती.

या कार्यक्रमासाठी गटविकासाधिकारी अमर माने, गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, केंद्रप्रमुख राजेंद्र जगताप, मंडल अधिकारी प्रभावती कोरे, आरोग्य विभाग प्रमुख बेलसर, जि.प.प्राथ. शाळा कुंभारवळण चे सर्व शिक्षक, पालक उपस्थित होते.

यावेळी आढावा अहवालाच्या निमित्ताने गावाला मिळालेल्या मोफत इंटरनेट सुविधेच्या माध्यमातून शितल खैरे-जाधव यांनी मुख्यमंत्री साहेबांसमोर ऑनलाईन पाठाचे उत्कृष्ट सादरीकरण केले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. व महानेटच्या माध्यमाने कोरोना संकटात ऑनलाईन शिक्षणामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणातील अडसर दूर होऊन विद्यार्थ्यांचा दर्जा नक्कीच उंचावणार असल्याचा विश्वास त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. तसेच महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान विभागाचे आभार मानले.

यावेळी मुख्यमंत्री साहेबांनी ऑनलाईन शिक्षणाबाबत काही सूचना असतील तर त्या आम्हाला शिक्षकांनी नक्की कळवा असे आवाहन केले. मुख्यमंत्री साहेबांशी सुसंवाद साधण्यासाठी खैरे यांना शिक्षण विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले.

न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा