पुण्यातील शाळा सुरू होणार, या आहेत मार्गदर्शक सूचना

पुणे, २५ डिसेंबर २०२०: देशात लॉक डाऊन घोषित केल्यापासून ते आत्तापर्यंत सर्वच शाळा व शिक्षण संस्था बंद होत्या. दरम्यान देशात काही राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यसरकारने देखीलनंतरच्या काळात शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. या अंतर्गत आता पुण्यामध्ये ही नववी ते बारावी चे वर्ग चार जानेवारीपासून सुरू करण्यास महानगरपालिकेने परवानगी दिली आहे. महानगरपालिका आयुक्तांनी याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाव्हायरस च्या संसर्गामुळे पुण्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दरम्यानच्या काळात प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे पुन्हा शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र, शाळा सुरू करताना शिक्षण संस्थांना व शाळांना कोरोनाबाबत आखून दिलेल्या सर्व नियमावलीचे व अटींचे पालन करावे लागणार आहे. दुसरीकडे राज्यात ७० टक्के नववी ते बारावी चे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. राज्यातील नववी ते बारावी वर्ग २३ नोव्हेंबरला सुरू करण्यात आले आहे. दरम्यान पुणे महानगरपालिकेने १२ डिसेंबर रोजी असा आदेश काढला होता की, ३ जानेवारी पर्यंत जिल्ह्यातील शाळा बंद राहतील.
शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना
• शाळेची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करणे.
• थर्मल स्कॅनर, ऑक्सीमीटर, जंतुनाशक अशा आवश्यक वस्तूंची उपलब्धता असेल याबाबत शाळा प्रशासनाने दक्षता घ्यावी.
• शाळा वाहतूक सुविधांचे नियमित निर्जंतुकीकरण आणि त्याची शाळा व्यवस्थापनामार्फत पडताळणी आवश्यक.
• सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची
‘कोविड-१९’ साठीची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक.
• वर्गखोली तसेच स्टाफरूममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमानुसार असावी.
• वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था करावी.
• शाळेच्या दर्शनी भागावर शारीरिक अंतर मास्कचा वापर याबाबत मार्गदर्शक सूचना असाव्यात.
• विद्यार्थी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी पालकांनी लेखी परवानगी पर्यवेक्षक किंवा शाळा प्रमुखांना सादर करावी.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा