पुरंदर, २६ डिसेंबर २०२०: पुरंदर तालुक्यातील जेजुरी मध्ये रात्री एकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रात्री दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून हा खून झाला असल्याची तक्रार मृताच्या नातेवाईकाने जेजुरी पोलिसात दिली आहे.
बारमध्ये दारु पित असताना मित्रांमध्ये बाचाबाची झाली, वाद विकोपाला गेला भांडणे वाढली, शेवटी खुन करण्यापर्यंत मजल गेली. खुन झाल्यावर मयताचे प्रेत पाण्याने भरलेल्या तलावात टाकून देण्यात आले. ही घटना घडली आहे जेजुरीच्या भरवस्ती, रात्री बारा वाजण्याच्या सुमारास.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जेजुरी येथे राहणारे रामदास मल्हारी दळवी यांनी याबाबतची तक्रार जेजुरी पोलिसात दिली आहे. त्यांचा भाऊ प्रसाद मल्हारी दळवी याच्याशी अमर मच्छिंद्र घोरपडे व निरंजन प्रदीप पवार यांचे काल रात्री ११ वाजलेच्या सुमारास तिरंगा हॉटेल मध्ये दारू पित असताना भांडण झाले होते.तेथील लोकांनी हे भांडण सोडवले होते.यानंतर प्रसाद त्याच्या मित्रासह घराजवळ आला होता. मात्र, त्या दरम्यान आमर घेरपडे याने प्रसाद आणि त्याचा मित्र अर्जून यांना होळकर तलावाकडे बोलावून घेतले. साडे बारा वाजलेच्या सुमारास घोरपडे आणि पवार यांनी प्रसादला बेदम मारले. त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला तलावात फेकून दिले.असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दळवी यांना प्रसाद चां मित्र अर्जुन याने याबाबतची माहिती दिलीय. त्यावरून त्यांनी तक्रार दिली आहे. दरम्यान पोलिसांनी प्रसादचां मृतदेह तलावातून बाहेर काढला असून उत्तरीय तपासनीस पाठवला आहे.
या बाबत जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये भारतीय दंड संहिता कलम ३०२, २०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा तपास डॉ. अभिनव देशमुख, मा.पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मिलिंद मोहिते अप्पर पोलीस अधीक्षक बारामती, धनंजय पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक हे करीत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे