पुणे, २८ डिसेंबर २०२०: २०२० वर्ष येत्या ३ दिवसात संपणार असून या वर्षात अश्या काही घटना घडल्या आहेत कि संपूर्ण जग कधीच विसरणार नाही. नेहमीच मरेपर्यंत त्यांच्या आठवणीत राहतील अश्या कडू आठवणी आहेत. तर लवकरच हे वर्ष संपून येणाऱ्या २०२१ कडून बर्याच लोकांना चांगलंवर्ष जाण्याची अपेक्षा आहे.पण २०२१ ची भविष्यवाणी करण्यात आली आसून तसे झाले तर खरंच २०२० पेक्षा २०२१ वर्ष संपूर्ण जगासाठी वाईट ठरेल.
२०२१ ची भविष्यवाणी खरी ठरली तर संपूर्ण जग पुन्हा एकदा भयंकर समस्यांना सामोरे जाईल. ही भविष्यवाणी केली आहे बाबा वेंगा यांनी, बाबा वेंगीचा जन्म १९११ साली झाला होता आणि १९९६ साली निधन झाले.पण त्या आधीच त्यांनी ५०७९ इसवी पर्यंतची भविष्यवाणी लिहून ठेवली आहे. एका माहिती नुसार बाबा वेंगाची ८५% भविष्यवाणी खरी ठरली आहे.
बाबा वेंगा यांनी सोव्हिएत युनियनचे विभाजन,९/११ च्या दहशतवादी हल्ला, प्रिंसेस डायनाचा मृत्यू,चेरनोबिल आपत्ती,असा अंदाज वर्तविला होता जो खरा झाला. म्हणून,वें गाच्या भविष्यवाणींना खूप महत्त्व दिले जाते. आता बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार २०२१ मध्ये संपूर्ण जगाला अनेक भयंकर आपत्तींना सामोरे जावे लागेल. भविष्यवाणीनुसार संपूर्ण जगाला यावर्षी भयानक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागणार आहे.
वेंगाच्या अंदाजानुसार परिस्थिती एका वेळेस इतकी बिकट होईल की जग संपुष्टात येईल. या आपत्तींमुळे, पृथ्वीवर मानवजातीच्या विचार करण्याच्या क्षमतेवरही वाईट परिणाम होईल. जर बाबा वेंगावर विश्वास ठेवला गेला तर चीन अमेरिकेला मागे टाकून जागतिक सत्ता बनेल. त्याचबरोबर भारताच्या शक्तींमध्येही वाढ होईल. युरोपमध्येही रासायनिक हल्ले होतील.
भविष्यवाणी खरी ठरली…..
वादळात रहस्यमयपणे डोळे गमावलेल्या बाबा वेंगा यांचे १९९६ मध्ये निधन झाले. २००१ च्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला, २००४ ची त्सुनामी, आफ्रिकन-अमेरिकन माणूस अमेरिकन अध्यक्ष बनने आणि २०१० मधील अरब स्प्रिंग यांसारख्या वेंगाने मरण येण्यापूर्वी अनेक महत्त्वाची भविष्यवाणी केली होती.जे आपण सर्वांनी खरे असल्याचे पाहिले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव