टायगर आणि डाॅलीच्या लग्नाची चर्चा महाराष्ट्रभर……

सांगली, २८ डिसेंबर २०२०: जगभरात नेहमीच विचित्र आणि नवल करायला लावणार्या घटना घडतात.अशीच एक घटना भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली शहरात घडली आहे. तुम्ही आत्ता पर्यंत माणसांचे लग्न होईपर्यंत ऐकले आहे. माणूस सोडून या पृथ्वीवर अनेक जीव आहेत. पण, निसर्गाने मानवाला या सर्वांपेक्षा वेगळे ठेवले आहे. पण, हल्ली हा मानव काय करेल याचा नेम नाही.

सांगलीत एका कुटुंबांने चक्क श्वानांचे लग्न लावून दिले. संजय नगरातील विलास गगणे यांच्या घरात वेगवेगळ्या जातीचे कुत्रा कुत्री आहेत. तर टायगर आणि डाॅली हे विवाहबंधनात अडकलेल्या श्वानांचे नाव आहे. अगदी सरकारच्या सुचनेचं पालन करत हा विवाह सोहळा संपन्न झाला.

एखाद्या कुटुंबातील वधू-वराच्या लग्नाप्रमाणेच या कार्यक्रमाचं आयोजन झाले होते.गाडीतून नवर्या आणि नवरी श्वानांचे आगमन, नाचायला वर्हाडी मंडळी, पुजा,रूखवत, बिदाई, जेवणाची पंगत असा सोहळा धुमधडाक्याने पार पडला. या अनोख्या लग्नासाठी परिसरातील नागरीक आणि बच्चे कंपनीने मोठ्या प्रमाणात हाजेरी लावली होती. तर टायगर आणि डाॅलीच्या लग्नाची चर्चा आता हळूहळू महाराष्ट्रभर पसरत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा