मुंबई, २९ डिसेंबर २०२०: क्रिकेट विश्वातील आयसीसीचे पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आसून कुणाला कोणते पुरस्कार मिळाले आहेत?याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
दशकातील सर्वोत्तम वन डे क्रिकेटपटू : विराट कोहली
दशकातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू : स्टीव्ह स्मिथ
दशकातील सर्वोत्तम टी-२० क्रिकेटपटू : राशिद खान
दशकातील सर्वोत्तम पुरूष क्रिकेटर ला दिला जाणारा “सर गार्फिल्ड सोबर्स पुरस्कार” : विराट कोहली
ICC spirit of cricket Award of the Decade : महेंद्र सिंग धोनी
दशकातील सर्वोत्तम वन डे महिला क्रिकेटपटू : ॲलेक्स पेरी
महेंद्र सिंग धोनी ला आयसीसी स्पिरीट ऑफ क्रिकेट पुरस्कार…..
भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीला आयसीसी स्पिरीट ऑफ क्रिकेट पुरस्कार मिळाला आहे. २०११ च्या कसोटीत जो रूटला आसताना ही धोनीनं खेळाडू वृत्ती दाखवत पुन्हा फलंदाजीला बोलावलं होतं.त्यासाठी हा पुरस्कार धोनीला मिळाला.
कोहली ठरला देशातील सर्वोत्तम क्रिकेटर….
मागील दहा वर्षात कोहलीने वन डे मधे १० हजारहून अधिक रन केले. यात त्यांने आपलं ३९ वं शतक आणि ४८ अर्धशतकं झळकावली या शिवाय ११२ कॅच देखील पकडले. दरम्यान संघाच्या विजयात हातभार लावणे हे माझे ध्येय आहे. प्रत्येक सामन्यात ते गाठण्याचा प्रयत्न मी करतो. अशी प्रतिक्रिया विराटनं दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव