आज पासून या स्मार्टफोनमध्ये व्हाट्सअॅप होणार बंद

15

पुणे, १ जानेवारी २०२१: आज एक जानेवारी पासून बऱ्याच स्मार्टफोन मध्ये व्हाट्सअॅप चालणे बंद होणार आहे. कंपनीने याबाबत अगोदरच निवेदन दिले होते. कंपनीच्या म्हणण्यानुसार तुमच्याकडे असलेल्या जुन्या स्मार्टफोनमध्ये असलेले अँड्रॉइड चे जुने व्हर्जन तसेच जुने झालेले हार्डवेअर याला नवीन व्हाट्सअॅप पूर्ण कार्यक्षमपणे सपोर्ट होत नाही. त्यामुळे कंपनी अशा स्मार्टफोनसाठी आपला सपोर्ट बंद करत आहे.

व्हाट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांच्या सुविधांसाठी तसेच ॲप नियमितपणे सुरळीत चालू राहण्यासाठी वेगवेगळे अपडेट्स च्या माध्यमातून नवीन फीचर्स मिळत असतात तसेच नवीन सिक्युरिटी पॅच देखील यामार्फत वापर कर्त्यां पर्यंत पोहोचत असतात. व्हाट्सअॅप नियमितपणे अपडेट होत असते. परंतु, जुने झालेले सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर याला हे नवीन अपडेट किंवा फीचर्स सपोर्ट करत नाही. त्यामुळेच कंपनीने आपला सपोर्ट अशा स्मार्टफोन साठी बंद केला आहे.

त्यामुळे आज एक जानेवारीपासून आयफोन सहित काही अँड्रॉइड फोन मध्ये जर व्हाट्सअॅप चालणे बंद झाले असेल तर आपल्याला त्याचे आश्चर्य वाटता कामा नये. कंपनीच्या म्हणण्यानुसार iOS 9 व्हर्जन पेक्षा जुन्या व्हर्जन वर चालत असणारे आयफोन तसेच Android 4.0.3 पेक्षा जुन्या व्हर्जन वर चालणारे अँड्रॉइड स्मार्टफोन यांच्यामध्ये एक जानेवारीपासून व्हाट्सअॅप आपला सपोर्ट बंद करणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे