मुंबई, ४ जानेवारी २०२१: भारतातील सात मोठ्या कंपन्यांमध्ये मागील आठवड्यात एकूण ७५,८४५.४६ रुपयांची वाढ दिसून आली. या सात कंपन्यांपैकी सर्वात जास्त नफा एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक या दोन कंपन्यांना झाला. यासह टाटा कन्सल्टन्सी सर्विस (टीसीएस), इन्फोसिस, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक आणि बजाज फायनान्स या कंपन्यादेखील या लाभामध्ये सहभागी राहिल्या.
तर दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आर आय एल) हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आणि भारतीय एअरटेल या कंपन्यांच्या बाजार भांडवलामध्ये (एम कॅप) घसरण बघण्यास मिळाली. एचडीएफसी चे बाजार भांडवल २०,८५७.९९ रुपये वाढून ४,६२,५८६.४१ कोटी रुपयांवर पोचले. तर एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल १५,३९३.९ रुपयांनी वाढून ७,८४७५८.५० कोटी रुपयांवर पोहोचले.
आयटी कंपनी इन्फोसिसचे बाजार भांडवल १०,२५१.३८ कोटी रुपये वाढून ५,३६,८७८.४५ कोटींवर पोहोचले. तर आयसीआयसीआय बँक चे बाजार भांडवल ९,६०९.३ कोटी रुपयांनी वाढून ३,६४,१९९.४० कोटी रुपयांवर पोहोचले. टीसीएसचे बाजार भांडवल ७,४१०.९६ कोटी रुपयांनी वाढून १०,९८,७७३.२९ कोटी रुपयांवर पोहोचले.
कोटक महिंद्रा बँकेचे बाजार भांडवल ६,५००.९४ कोटी रुपयांनी वाढून ३,९४,९१४.९८ कोटी रुपयांवर पोहोचले तर बजाज फायनान्स चे बाजार भांडवल ५,८२०.९९ कोटी रुपयांनी वाढून ३,१८,१८१.१८ कोटी रुपयांवर पोहोचले.
दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज चे बाजार भांडवल ४,२७९.१३ कोटी रुपयांनी घसरून १२,५९,७४१.९६ कोटी रुपयांवर आले आणि हिंदुस्तान युनिलिव्हर (एच यु एल) चे बाजार भांडवल २,९४८.६९ कोटी रुपयांनी घसरून ५,६०,९३३.०६ कोटी रुपयांवर आले. भारतीय एअरटेल चे बाजार भांडवल १,०६३.८३ कोटी रुपयांनी घसरून २,८१,०१५.७६ कोटी रुपयांवर आले.
बाजार भांडवलाच्या तुलनेत अजून देखील रिलायन्स इंडस्ट्रीज सर्वोच्च स्थानी आहे. यानंतर टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस), एचडीएफसी बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर (एच यु एल), इन्फोसिस, एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक, आय सी आय सी आय बँक, बजाज फायनान्स आणि यानंतर भारतीय एअरटेल चे स्थान आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे