जाणून घ्या काही नववर्षाच्या रंजक गोष्टी…..

पुणे, ७ जानेवारी २०२१: नवीन वर्ष आले आसून २०२० या वर्षाला संपूर्ण जगाने निरोप दिला आहे. २०२१ हे नवीन वर्ष जगभरातील प्रत्येक देशात वेगवेगळ्या पद्धतीने आणि परंपरेने साजरा केला जाते, तर काही संकल्प तसेच काही तथ्य या बद्दल आपण जाणून घेणार आहोत.

४००० वर्ष….

प्राचीन बॅबिलोनी लोकांनी पाहिले नवीन वर्ष ४००० वर्षापुर्वी साजरे केले. रोमाचा सम्राट ज्युलिअस सीझरने १ जानेवारीला पहीली राष्ट्रीय सुट्टी जाहिर केली.

या देशात आता २०१३ साल…..

इथिपियामध्ये त्यांच्या कॅलेंडर सिस्टमनुसार १३ महिने आहेत. ग्रेग्रेरियन कॅलेंडरपेक्षा ते ७ वर्षांनी मागे आहेत. म्हणजे इथिपियामध्ये ‌सध्या २०१३ हे वर्ष सुरू आहे. ते ११ सप्टेंबरला नवीन वर्षाचे स्वागत करणार आहे.

या देशात २५ मार्च ला साजरे होते नवीन वर्ष…..

अधिकृतपणे इंग्लंड मधे १७५१ हे सर्वात लहान वर्ष होते. फक्त २५ मार्च ते ३१ डिसेंबर.तोपर्यंत १ जानेवारी नाही, तर २५ मार्चला नवीन वर्ष साजरे केले जात होते.इंग्लंड ने १७५२ मधे ग्रेग्रेरियन कॅलेंडर स्विकरले.

दोन डोक्याचे देव…

जानेवारीला दोन डोके असलेला देव जनुस यांचे नाव देण्यात आले आहे. मागे आणि पुढे म्हणजेच जुन्या आणि नवीन वर्षाकडे ते पाहताना दिसतात. म्हणून त्यांचे नाव देण्यात आले आहे.

या देशात दोन वेळा नववर्ष साजरे….

रशियामधे एकाच महिन्यात दोन वेळा नवीन वर्ष साजरे केले जाते. १ आणि १४ जानेवारीला साजरे करतात. म्हणजेच वर्षातून दोनदा रशियात नवीन वर्ष साजरे केले जाते.

या बेटावर होते स्वागत….

टोगांच्या पॅकाफीक बेटावर ३१ डिसेंबरला सकाळी १० वाजता नवीन वर्षाचे पहिल्यांदाच स्वागत केले जाते. तर मध्य प्रशांत महासागरात आसलेल्या बेकर्स बेटावर १ जानेवारीला दुपारी १२ वाजता नव वर्षाचे स्वागत केले जाते.

चोरांसाठी प्रिय दिवस…..

३१ डिसेंबरला आणि १ जानेवारीला मोठ्या प्रमाणात गुन्हे घडतात. तर १ जानेवारी हा कार चोरांसाठी लोकप्रिय दिवस समजला जातो.

संकल्प….

जसा १ जानेवारी येतो तसे प्रत्येकजणं नवीन संकल्प करत वर्षाचे स्वागत करतात. म्हणजे हे संकल्प टिकले तर टिकतात नाही तर मग…..पण, या सर्वात आणखी काही वजनदार मंडळी अर्थात जाड व्यक्ती वजन कमी करण्याचे संकल्प करतात.

तर अश्या पद्धतीने संपूर्ण वर्षाभराचे काही तथ्यं आणि तुम्हाला माहिती नसलेल्या काही गोष्टी होत्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा