नीरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाला रासपचा विरोध

बारामती २० जानेवारी २०२१ : बारामती तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाला विरोध करण्यात आला आहे.या कामामुळे जमिनीत पाण्याचा पाझर बंद होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत निवेदन रासपच्या वतीने पाटबंधारे विभागाचे अभियंता अश्विन पवार यांना देण्यात आले आहे.

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष अँड.अमोल सातकर यांनी सांगीतले बारामतीतुन जाणाऱ्या नीरा डावा कालव्याच्या डागडुजी अस्तरीकरणाचे काम सुरू असुन यामुळे पाण्याचा पाझर बंद होऊन कालव्याच्या शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.तसेच कालव्या लगतच्या लोकवस्तीतीत असणाऱ्या बोअरवेल, विहीरींना देखील पाण्याची कमतरता जाणवणार आहे.कालव्याच्या आजुबाजुला असणाऱ्या झाडांना देखील याचा धोका निर्माण होणार असून पर्यायाने पर्यावरणाचा ऱ्हास होईल यांसाठी सुरु असणाऱ्या अस्तारीकरणामध्ये जर तीन इंचाचे होल ठेवले तर,यामुळे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होईल, यावर उपअभियंता पवार यांनी आपली मागणी योग्य आहे.वरिष्ठांशी बोलुन मार्ग काढू ,असे सांगितले यावेळी,पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख विठ्ठलराव देवकाते,डाॅ नवनाथ मलगुंडे,किशोर सातकर, निखील दांगडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा