विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून तीन आठवडे होत आले आहेत. तरीही शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद चालू आहेत. आता हा वाद वरीष्ठ पातळीवर गेला असल्याचे दिसून येत आहे.
युती तुटल्याची अधिकृत घोषणा झाली नसली तरी दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोड्या करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे समोर आले आहे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून १८ नोव्हेंबर पासून सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नेहमीप्रमाणे घटकपक्षांची बैठक होत असते. मात्र यावेळी या बैठकीसाठी ३० वर्षांत पहिल्यांदाच शिवसेनेला अद्याप निमंत्रण पाठवण्यात आलेले नाही. त्यामुळे भाजपने शिवसेनेसोबत केंद्रातील नेतृत्वामार्फत युती तोडायचे संकेत दिले असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, शिवसेना गटनेते खासदार विनायक राऊत यांनी रालोआ बैठकीचे निमंत्रण अद्याप मिळाले नसल्याचे सांगितले.