राणी मुखर्जीचा “मर्दानी २” सापडला वादात

राणी मुखर्जीची पुनरागमन फिल्म म्हणून ‘मर्दानी’कडे पहिले जाते. या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता राणी ‘मर्दानी 2’ द्वारे चाहत्यांच्या भेटीला येत आहे.

यशराज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेल्या राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी 2’ चित्रपटाचा ट्रेलर समोर येताच त्याला विरोधही व्हायला सुरुवात झाली आहे. कोटा शहरातील अनेक व्यावसायिक आणि सामाजिक संस्थांनी राणी मुखर्जीच्या या चित्रपटाच्या आशयाचा निषेध करत, त्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. चित्रपटाद्वारे कोटा शहराची वाईट प्रतिमा दर्शविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे.

मर्दानी २ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कोटा शहराला ‘कोचिंग सिटी’ म्हणून दर्शवले आहे. देशभरातून इथे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. चित्रपटात या शहरात होणाऱ्या बलात्काराच्या घटनांवर भाष्य केले आहे. त्यामुळे इथल्या लोकांचे म्हणणे आहे की, या काल्पनिक कथेमध्ये कोटाचे नाव घेतले जाऊ नये. या चित्रपटामुळे कोटाचे नाव बदनाम होईल आणि म्हणून चित्रपटामधून शहराचे नाव काढून टाकले पाहिजे. या चित्रपटाचे बरेचसे शूटिंगही कोटामध्ये झाले आहे.

त्यामुळे चित्रपटातुन शहराचे नाव वगळावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा