नवी दिल्ली, ६ फेब्रुवरी २०२१: रेनेगड्स संघासाठी खेळणारा खेळाडू विल सदरलैंड यावर बायो बबल मोडण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी सुद्धा क्रिकेट मध्ये सावधानी साठी क्रिकेटपटूना बायो बबल मध्येच राहावे लागते आणि बायो बबल तोडणाऱ्या खेळाडूवर योग्य ती कारवाई केली जाते.
विल सदरलैंड याला बायो बबल चे नियम मोडत बाहेरील लोकांसोबत जेवण करतांना पाहिले गेले आहे. तसेच बाहेर जाऊन गोल्फ खेळताना सुद्धा पाहिले गेले आहे. याच कारणास्तव त्याच्यावर दंड आकारण्यात आला आहे. तसेच स्पर्धेच्या व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार, विल सदरलैंड याने आपली चुकी मान्य केली आहे.
विल सदरलैंड याने आपली चुकी मान्य तर केली आहे परंतु दंड भरण्यास नकार दिला आहे. स्पर्धेच्या व्यवस्थापकांतर्फे त्याच्यावर १० हजार डॉलर्स इतका दंड आकारण्यात आला होता. परंतु त्याने भरण्यास नकार दिल्यामुळे हा दंड ५ हजार डॉलर्स इतका करण्यात आला आहे.
डिसेंबर मध्ये सुद्धा अशी घटना घडली होती. त्यावेळी ब्रीसबेन हिट संघासाठी खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडू क्रिस लीन आणि डैन लॉरेंस यांच्यावर बायो बबल मोडण्यामुळे दंड आकारण्यात आला होता. याआधी दुबई मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत ही बायो बबल चा वापर केला गेला होता परंतु सर्व खेळाडूंनी बायो बबल चे काटेकोर पणे पालन केले होते. आता इंग्लंड संघ भारतीय दौऱ्यासाठी आला आहे. इंग्लंड संघाला ही बायो बबल चे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे