नवी दिल्ली, ८ फेब्रुवरी २०२१: कॅपिटल मार्केट रेग्यूलेटर सेबी ने फ्युचर रिटेल लिमिटेडचे माजी प्रमोटर किशोर बियाणी यांना सिक्युरिटी बाजारात एक वर्षासाठी प्रतिबंधित केले आहे. यासह त्यांचे बंधू अनिल बियाणी आणि फ्युचर कॉर्पोरेट रिसोर्सेस लिमिटेड वर देखील प्रतिबंध लावला आहे. आता सेबीच्या या निर्णयाच्या विरोधात किशोर बियाणी, त्यांचे बंधू आणि एफसीआरएल ने सिक्युरिटीज अपील ट्रीब्यूनल (एसएटी) चा दरवाजा ठोठावला आहे.
वास्तविक, सेबीने आंतरिक व्यापाराच्या (इन्साईडर ट्रेडिंग) आरोपानंतर बियाणी बंधू आणि एफसीआरएलवर ही बंदी घातली. याची माहिती सेबीने ३ फेब्रुवारी रोजी दिली होती. बियाणी बंधू आणि एफसीआरएल यांच्यावर २०१७ मध्ये फ्यूचर रिटेल लिमिटेडच्या शेअर्समध्ये अंतर्गत व्यापार(इन्साईडर ट्रेडिंग) केल्याचा आरोप आहे.
फ्यूचर रिटेल लिमिटेड शेअर्स च्या खरेदीसाठी, विक्री किंवा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही प्रकारचा करार केल्याबद्दल सेबीने बियानी बंधू आणि एफसीआरएलला २ वर्षांसाठी बंदी घातली आहे. म्हणजेच, आता एक वर्षासाठी ते शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग करू शकणार नाही. सेबीने किशोर बियानी, अनिल बियाणी आणि फ्यूचर कॉर्पोरेट रिसोर्सेसवर प्रत्येकी एक कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या तिघांना चुकीच्या पद्धतीने मिळवलेल्या १७.७८ कोटी रुपये परत करण्यास सांगितले गेले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे