राज्यात पुन्हा लॉक डाऊन होण्याची शक्यता…?

मुंबई, १६ फेब्रुवरी २०२१: सध्या देशभरात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. एकीकडे ही दिलासादायक घडामोड घडत असताना दुसरीकडे पुन्हा लॉक डाऊन ची चर्चा होऊ लागली आहे. कोरोना बाबत नियमांकडे नागरिक सर्रास दुर्लक्ष करताना दिसत आहेत. अश्यात संक्रमण पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात रविवारी आणि सोमवारी कोरोना रुग्णांमध्ये भलतीच वाढ झाली. रविवारी जवळपास साडे तीन हजार कोरोना रुग्ण आणि सोमवारी ३ हजार ३६५ नवे रुग्ण मिळाले. पाठीमागच्या दोन आठवड्यांत जवळपास २१ हजार जणांना कोरोनाचा संसर्ग जडला आहे.
महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीच्या दिवशी ३८०० कोरोना केसेस समोर आल्या. त्यानंतर डिसेंबर, जानेवारीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. परंतु आता फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा कोरोना केसेस वाढल्याचे समोर येत आहे. त्यामुळे लोकांमध्ये लॉकडाऊन लागणार असल्याच्या चर्चा आहेत.
एकूणच सर्व परिस्थिती पाहता राज्यात पुन्हा लॉक डाऊन ची चर्चा सुरू झाली आहे. काल अजित पवारांनी देखील याबाबत संकेत दिले होते. आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चर्चेची शक्यता आहे. जर कोरोनाचा असाच प्रकोप कायम राहिला तर पुन्हा एकदा लॉकडाऊन होईल का? लॉकडाऊन केलं तर कोणत्या भागांत केलं जाईल? त्याची रुपरेशा काय असेल? असे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा