मुंबई, १९ फेब्रुवरी २०२१: संपूर्ण भारत आज जरी पुर्वपदावर येत असला तरी कोरोनाचे सावट संपले नाही. त्यातच आता अनेक वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे आणि आश्यातच महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. त्यामुळे सरकार नागरिकांना सतत काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याचे अहवान करत आहे.
राज्यात कोरोनाचे रूग्ण पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यातच राज्यात गुरूवारी कोरोनाचे ५,४२७ नवीन रूग्ण आढळले. तर ३८ जणांचा मृत्यू झाला. राज्यात कोरोना रूग्णांची संख्या आता २०,८१,५२० इतकी झाली आहे. तर आत्ता पर्यंत १९,८७,८०४ रूग्णांनी कोरोना वर यशस्वी रित्या मात केली आहे.
राज्यात सध्या ॲक्टिव्ह ४०,८५८ रूग्ण आहेत. तर आत्ता पर्यंत ५१,६६९ रूग्ण कोरोनामुळे बळी पडले आहेत. मध्यंतरी राज्यात कोरोना आटोक्यात आला होता. तर सरकारने ही या सर्व गोष्टी लक्षात घेऊन हळूहळू निर्बंधे उठवत होती. मात्र, नागरिक नियमांचे पालन नीट करत नसल्याने त्याचा परिणाम दिसत आहे.
कोरोना विषाणुवर सध्या संपूर्ण देशभरात लसीकरणाचे काम सुरू आहे. पण सर्वसामान्य जनतेपर्यंत ही लस पोहचण्यात अजून काही वेळ जाणार आहे. तोपर्यंत नागरिकांनी सतर्क रहाणे गरजेचं आहे. मात्र, या उलट दृश्य पाहायला मिळत आहे.
राज्यात सरकार शर्तीसह सर्व गोष्टींवर निर्बंध उठवत आहे. पण, नागरिक कुठल्याही सुचनांचे पालन करताना दिसत नाहीत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून कोरोनाची लाट उसळताना दिसत आहे. मास्क न लावणे, खोकताना, शिंकताना नाकावर तोंडावर हात, रूमाल न धरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अश्या पद्धतीचे नागरिकांचे वर्तन सुरू आहे. ज्यामुळे कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येण्याची भिती आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील या परिस्थितीवर आपलं मत व्यक्त करत, जर लोकांनी नियमांचे काटेकोर काटेकोर पणे पालन नाही केलं तर पुन्हा एकदा राज्यात लाॅकडाऊन लगेल आणि त्याची मानसिकाता जनतेनं ठेवावी असे सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव