बडीशेप चे फायदे जाणून घ्याल,तर मग रोज नियमित सेवन कराल…..

पुणे, १० मार्च २०२१ :आजकाल अनेक वेळा कुटुंबाबरोबर वेळ घालवण्यासाठी तुम्ही आठवड्यातून दोन तीन वेळा बाहेर रेस्टॉरंट मध्ये जेवणासाठी जात आयताच.जणू आज घडीला तो एक ट्रेंडच झाला आहे.पण जेवण झाल्यावर तुम्हाला नेहमी बडीशेप किंवा खडीसाखर का दिली जाते याचा विचार तुम्ही केलाय का?आज आम्ही त्या बद्दलच तुम्हाला रंजक तथ्य सांगणार आहोत.

तसे हाॅटेल आणि रेस्टॉरंट मधील जेवण जास्त मसाले दार असते आणि त्यामध्ये ही तुम्ही ज्या सॅलड चे सेवन करता त्यामुळे तुमच्या तोंडातून वास येतो.त्यामुळे बचाव करण्यासाठी सौंफ,खडीसाखर दिली जाते.जाणून घेऊ काही तथ्य……

तोंडाची दुर्गंधी दूर करणे….

बाहेर च्या जेवणात मसाले आणि सॅलिडचा समावेश आसतो.ते तुम्ही खाल्ले की तुमच्या तोंडातून दुर्गंधी येते.पण बडीशेप खाल्ल्यावर ती नाहीशी होते.

पाचन शक्ती वाढवणे….

बाहेरच जेवण्यातील मसाल्यामुळे तुमच्या पाचन शक्ती वर परिणाम होऊ शकतो.अनेक वेळा अॅसिडिटी ची समस्या ही उद्भवू शकते.पण बडीशेप पाचन शक्ती वाढवण्यास मदत करते.जेवल्यानंतर याचे सेवन केले तर ममग अॅसिडिटी होत नाही.

काॅलेस्ट्राॅल कमी करतो….

काॅलेस्ट्राॅलने तर आज प्रत्येक दुसरी व्यक्ती त्रस्त आहे.पण ज्यांना हा त्रास आहे.त्यांनी बडीशेप चे सेवन करायला हवे. ज्यामुळे काॅलेस्ट्राॅल कमी होण्यास मदत मिळते तर ह्रदयाची काळजी घेण्यासाठी बडीशेप उत्तम का करते.

डोळ्यांची ताकत वाढवते, स्मरण शक्ती वाढवते…..

सौंफ आणि मिश्रीच्या दोन तीन दाण्याचे सेवन तुम्ही दिवसातून दोन तीन वेळा केलात.तर तुमच्या डोळ्याची रोशनी वाढण्यास मदत होते.तसेच सौंफ जर तू नियमित वारंवार खाल्ली तर तुमचा मेंदू तल्लख आणि तीक्ष्ण होतो.ज्या मुळे तुमची स्मरण शक्ती आधिक मजबूत होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा