मुंबई, १७ एप्रिल २०२१: राज्यात लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी उच्चांकी कोरोना आकडेवारी समोर आली आहे. काल राज्यात ६३ हजार ७२९ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी ३० लाख ०४ हजार ३९१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्यात आजमितीस एकूण ६,३८,०३४ एकूण रुग्ण सक्रिय असून, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३७,३,५८४ झालीय.
काल ४५ हजार ३३५ बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.१२ टक्के एवढं झाले आहे. राज्यात आज ३९८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण ५९ हजार ५५१ जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.६१ टक्के एवढा आहे.
सध्या राज्यात ३५ लाख १४ हजार १८१ जण होम क्वारंटाईन आहेत तर, २४ हजार १६८ जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत २ कोटी ३३ लाख ०८ हजार ८७८ नमूने तपासण्यात आले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे