प्रसिद्ध जेष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे काळाच्या पडद्याआड,सिनेसृष्टीचे मोठं नुकसान……

पुणे, १९ एप्रिल २०२१: प्रसिद्ध निर्मात्या,जेष्ठा दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे सोमवारी सकाळी पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले.त्यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या अश्या अचानक जाण्याने चित्रपट सृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

सुमित्रा यांच्या ‘बाई’, ‘पाणी’ हे दोन लघुपटं चांगलीचं गाजली. या लघुपटांना मिळालेल्या यशानंतर त्यांनी ‘दोघी’ हा चित्रपट १९९५ साली तयार केला. ‘दहावी फ’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘बाधा’, ‘नितळ’, ‘एक कप च्या’, संहिता, ‘घो मला असला हवा’, ‘कासव’, ‘अस्तु’ या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सुमित्रा यांनी उत्तम रित्या पार पाडली.

सुमित्रा भावे यांना मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार….

बाई – १९८५ – सर्वोत्कृष्ट कुटुंबकल्याण चित्रपट
पाणी – १९८७– सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट
वास्तुपुरुष – २००२ – सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
देवराई – २००४ – सर्वोत्कृष्ट पर्यावरण विषयक चित्रपट
अस्तु – २०१३ – सर्वोत्कृष्ट पटकथा
कासव – २०१६ – सर्वोत्कृष्ट चित्रपट

राज्य शासन पुरस्कार विजेते चित्रपट….

दोघी
दहावी फ
वास्तुपुरुष
नितळ
एक कप च्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा