ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू पॅट कमिन्सन’ने पीएम केअरमध्ये दिली ५० हजार डॉलर्स ची देणगी

नवी दिल्ली, २७ एप्रिल २०२१: कोरोनाने देशालाच नाही तर संपूर्ण जगाला वेड लावलं आहे. पण, यामधेच सर्वत्र चर्चा होत आहे ती म्हणजे कोलकता नाईट रायडर्स चा आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू पॅट कमिन्सनची. पॅट ने देशाला या कोरोना परिस्थितीशी लढा देण्यासाठी आणि ऑक्सिजनसाठी ५० हजार डाॅलर्स पीएम केअर फंडाला दिले. ज्यामुळं सर्व सोशल मिडियावर तसंच अनेक माध्यमातून त्याचं तोंड भरून कौतुक केलं जात आहे.

ऑस्ट्रेलियाचा प्रमुख गोलदांज पॅट कमिन्सनं भारतात चालू असलेल्या कोरोनाचा प्रकोप पाहून मदतीचा हात पुढे केला आणि ५० हजार डाॅलर्स म्हणजेच जवळपास ३० ते ३७ लाख पीएम केअर फंडाला दिले. पॅप सध्या कोलकता नाईट रायडर्स संघाकडून खेळतो आहे. तर कोरोना मुळं केन रिचर्डसन, झॅम्पा, जोश फिलीप, ॲण्ड्रयू टाय यांनी IPL सोडून मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा