कोविशील्ड लसीचे दर १०० रुपयांनी कमी

8

मुंबई, २९ एप्रिल २०२१: आकाशवाणीसिरम इन्सिस्टयूटच्या कोविशील्ड या लसीचे दर १०० रुपयांनी कमी केल्याचे सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी आपल्या ट्विटर संदेशात आज जाहीर केलं, त्यानुसार आता सरकारीरुग्णालयांसाठी ही लस ३०० रुपयांना उपलब्ध होईल, त्यामुळे राज्य सरकारची मोठ्याप्रमाणात बचत होणार आहे, असंही या संदेशात म्हटलं आहे.

सीरमच्या कोविशील्ड लसीचे जुने दर

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने काही दिवसांपूर्वी भारत सरकारच्या सूचनेनुसार कोविशील्ड लशीची किंमत निश्चित केली होती. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने राज्य सरकारसाठी ४०० रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी ६०० रुपये प्रति डोस दराची घोषणा केली होती.

भारतात सध्या दोन लस मान्यताप्राप्त

सीरम इन्स्टिट्यूट निर्मित ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेकाची लस ‘कोविशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोवॅक्सिन’ यांना मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारने १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना १ मेपासून लस देण्याची घोषणा केली होती आणि असेही म्हटले होते की, लसीकरणाच्या तिसर्‍या टप्प्यातील भाग लस उत्पादक कंपन्यांनी आपल्या केंद्रीय औषध प्रयोगशाळेमधून (सीडीएल) ५० टक्के पुरवठा केंद्र सरकारला द्यावा आणि उर्वरित ५० टक्के पुरवठा राज्य सरकारांना व खुल्या बाजारात विकण्यास त्यांना परवानगी असेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे