वॉशिंग्टन, ६ मे २०२१: ह्या आठवड्यात पृथ्वीला अवकाशातील दोन धूमकेतू पासून धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे. यातील काल रात्रीच्या सुमारास एक धूमकेतू खूप जवळून जाणार होता तर दुसरा धूमकेतू ६ मे रोजी म्हणजेच आज रात्री ९.३० च्या सुमारास पृथ्वीच्या जवळून जाण्याची शक्यता आहे. अमेरिकन अंतरिक्ष संशोधन संस्थेने याला पोटेंशियली हजार्ड्स एस्टेरॉयड म्हटलं आहे. म्हणजेच पृथ्वीसाठी हे धूमकेतू धोकादायक असणार आहे. कारण हे धूमकेतू पृथ्वीपासून ७४.७९ लाख किलोमीटर अंतरावरून जाणार आहे. हे अंतर खगोलशास्त्रामध्ये अतिशय कमी मानलं जातं. कारण धूमकेतू अवकाशामध्ये हजारो किलोमीटर च्या स्पीडनं धावत असतात.
नासाच्या सेंटर फोर नियर अर्थ ऑब्जेक्ट स्टडीज संस्थेच्या म्हणण्यानुसार यापूर्वी अनेक वेळा धूमकेतू पृथ्वीच्या जवळून गेले आहेत. यानंतर हे धूमकेतू सूर्याची परिक्रमा करण्यासाठी पुढं निघून जातात. सध्या जे धूमकेतू पृथ्वीच्या जवळून जाणार आहेत त्यांची नावं २०२१ एच सी ३ आणि २०२१ ए इ ४ अशी आहेत. या अंतरा बाबत बोलायचं झालं त्तर पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये जे अंतर आहे त्याच्या १८ पट लांब हे धूमकेतू असणार आहेत. परंतु खगोलशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे अंतर खूपच कमी आहे.
धूमकेतूंचं पृथ्वीपासूनचं अंतर ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट ने मोजलं आहे. ऍस्ट्रॉनॉमिकल युनिटला हे माहीत आहे की कोणता धूमकेतू पृथ्वीपासून किती अंतरावरुन जाणार आहे. २०२१ एच सी ३ काल रात्री ०.०४७ एयू म्हणजेच ७०.३१ लाख किलोमीटर अंतरावरून जाणार आहे. हा धूमकेतू जवळपास ४६० फूट क्षेत्रफळाचा आहे. परंतु हे क्षेत्रफळ अचूकपणे सांगता येणं कठीण आहे. हा धूमकेतू ९८४ फूट क्षेत्रफळाचा देखील असू शकतो. म्हणजेच एम्पायर स्टेट बिल्डिंग पेक्षाही मोठा.
दुसरा धूमकेतू २०२१ एई ४ गुरुवार, ६ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. त्याचा वेग ताशी ३२,६५२ किलोमीटर आहे. म्हणजेच हा वेग प्रति सेकंद ९.०७ किलोमीटर आहे. त्याचा आकार १२० मीटर ते २६० मीटर दरम्यान असू शकतो. म्हणजे ३९३.७० फूट ते ८५३ फूट.
सीएनईओएसच्या मते, ३२८ फूट किंवा १०० मीटरपेक्षा जास्त मोठा उपग्रह पृथ्वीसाठी धोकादायक ठरू शकतो. पण मागील अंदाजानुसार पृथ्वीला लघुग्रहांचा धोका दर १० हजार वर्षांनी असतो. जर एक किलोमीटर आकाराचा धूमकेतू पृथ्वीवर आदळला तर यामुळं संपूर्ण पृथ्वीवर विनाश होऊ शकतो. तथापि, इतका मोठा धूमकेतू अद्याप कोट्यावधी वर्षांत पृथ्वीवर आदळला नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे