देशात सलग सातव्या दिवशी २ लाखांपेक्षा कमी दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद

8

नवी दिल्ली, ४ जून २०२१: भारतात गेल्या २४ तासांत १,३४,१५४ दैनंदिन नवीन रुग्णसंख्येची नोंद झाली. देशात सलग सातव्या दिवशी २ लाखांपेक्षा कमी दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्र आणि राज्य तसेच केंद्रशासित प्रदेश यांच्या शासनांनी मिळून एकत्रितपणे केलेल्या परीश्रमांमुळे हा परिणाम साध्य झाला आहे.

भारतात सक्रीय रुग्णांच्या संख्येत सतत घसरण होत असल्याचे दिसून येत आहे. काल १७,१३,४१३ सक्रीय रुग्णांची नोंद झाली. गेल्या २४ तासात सक्रिय रूग्णसंख्येत एकूण ८०,२३२ इतकी घसरण झाली. आता देशातील सक्रीय रुग्ण संख्या एकूण बाधित रुग्णांच्या ६.०२% आहे.

दैनंदिन बरे झालेल्यांची संख्या दैनंदिन नवीन रुग्णांच्या तुलनेत सलग २१व्या दिवशी अधिक आहे. गेल्या २४ तासांत २,११,४९९ जण बरे झाल्याची नोंद झाली आहे. दैनंदिन नवीन रुग्णांच्या तुलनेत गेल्या २४ तासांत ७७,३४५ हून अधिक रूग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे.

या महामारीची लागण झाल्यापासून, संसर्ग झालेल्या लोकांपैकी २६३,९०,५८४ नागरिक कोविड-१९ या आजारातून बरे झाले आहेत आणि गेल्या २४ तासांत २,११,४९९ रूग्ण बरे झाले आहेत. एकूण रूग्ण बरे होण्याचा दर ९२.८९%,इतका आहे, जो सातत्याने वाढता कल दर्शवित आहे.

गेल्या २४ तासात एकूण २१,५९,८७३ चाचण्या करण्यात आल्या आणि आतापर्यंत भारताने एकूण ३५.३ कोटी ( ३५,३७,८२६४८) चाचण्या पूर्ण केल्या आहेत.

देशभरात एकीकडे चाचण्या करण्याचे प्रमाण वाढत आहे, तसेच साप्ताहिक पॉझिटिव्हिटीच्या दरात सतत घट दिसून येत आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटीचा दर सध्या ७.६६% आहे तर दैनंदिन पॉझिटिव्हिटीचा दर कमी झाला असून तो आज ६.२१% वर आहे. सलग दहा दिवस तो १०% पेक्षा कमी आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा