श्रीनगर, २९ जून २०२१: एअरफोर्स स्टेशनवर ड्रोन हल्ल्याच्या कारवाईनंतर सोमवारी सैनिकांनी श्रीनगरच्या मलूरा-परिमपोरा येथे दहशतवाद्यांना वेढा घातला. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. अशी भीती व्यक्त केली जात आहे की दोन-तीन दहशतवादी येथे लपले आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केलंय.
या गोळीबारात सैन्याचे सहाय्यक कमांडंट, एक उपनिरीक्षक आणि एक जवान जखमी झाल्याची माहिती आहे. तिघांनाही रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आलंय. संध्याकाळी ६ वाजल्यापासून सुरक्षा दलांनी हा संपूर्ण परिसर घेतलाय. प्रथम स्थानिक लोकांना येथून बाहेर काढण्यात आलं, त्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांवर कारवाई सुरू केली. एन्काऊंटर अद्याप चालू आहे.
लष्कर-ए-तैयबाच्या शीर्ष कमांडरला अटक
दरम्यान, सुरक्षा दलाला मोठं यश मिळालंय. जवानांनी सोमवारी लष्कर-ए-तैयबा या अतिरेकी संघटनेचा शीर्ष कमांडर नदीम अबरार याला अटक केली. जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलांवर आणि नागरिकांवर अनेक हल्ल्यांमध्ये तो सहभागी होता. नदीम गाडीत जात असताना त्याला श्रीनगरमध्ये अटक करण्यात आली होती. कारमधून एक पिस्तूल आणि एक ग्रेनेडही जप्त करण्यात आलंय. अशीही बातमी आहे की नदीमवर विचारपूस केल्यानंतरच सुरक्षा दलाने श्रीनगरमधील मालुरा-परिमपोरा येथे चकमक सुरू केली.
गेल्या २४ तासांत तीन मोठ्या घटना घडल्या
गेल्या २४ तासांत श्रीनगरच्या सर्वात सुरक्षित भागात दोन मोठ्या घटना घडल्या आहेत, तर दहशतवाद्यांनी त्रल येथील पोलिस कर्मचार्याच्या कुटुंबाला लक्ष्य केलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे