एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील नोकरी नाही, स्वप्निल लोणकरची आत्महत्या

पुणे, ५ जुलै २०२१: कोरोनामुळं सर्वांची आर्थिक परिस्थिती बिकट झालीय. या काळात अनेक जणांनी आत्महत्येचा देखील पर्याय निवडला. पुन्हा एकदा अशीच घटना समोर आली आहे. पण, यावेळी एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनं आत्महत्या केलीय. एमपीएससी उत्तीर्ण होऊनदेखील दीड वर्षे झाले तरी त्याला लोकसेवा आयोगाने नियुक्ती दिली नाही. अखेर नैराश्यातून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. स्वप्नील लोणकर असं या तरुणाचं नाव आहे.
ही घटना २९ जून ची आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट देखील लिहिली होती. त्याच्या सुसाईड नोट मधून अनेक खुलासे देखील झाले आहेत. पुण्यातील फुरसुंगी येथे स्वप्निल ने गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्यांसह परीक्षांच्या तारखांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील वेळेत नियुक्ती न होणं हा एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न आहे. यालाच स्वप्निल बळी पडला आहे.
वास्तविक स्वप्नीलने परीक्षा दिल्यानंतर दोन वर्ष होऊन देखील मुलाखत झाली नव्हती. कोरोना च्या काळात आर्थिक तंगी जाणवू लागली होती. त्यात परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील नियुक्ती झालीच नाही त्यामुळं स्वप्नील नैराश्यात गेला होता. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यांसारख्या कारणांमुळंही स्वप्नीलवरील तणाव वाढत गेला. वाढत्या तणावामुळं त्याचा संयम संपला आणि अखेर त्याने आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल घेतलं.
स्वप्नीलने सुसाईड नोटमध्ये काय म्हटलंय?
पासआऊट होऊन दोन वर्ष झाली आहेत. २४ वय संपत आलंय. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेले कर्ज, खासगी नोकरी करुन कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना. नकारात्मकतेची ही वादळं कित्येक दिवस मनात होती. पण काही तरी चांगलं होईल या आशेवर तग धरला होता. पण आता इथून पुढे काहीच उरलेलं नाही. यास कोणत्याही व्यक्ती कारणीभूत नसून हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. मला माफ करा, १०० जीव वाचवायचे होते, मला डोनेशन करुन मात्र आता ७२ राहिले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा