स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर विरोधकांचा सरकारवर निशाणा.

मुंबई ५ जुलै २०२१ :  एमपीएसीच्या परीक्षेमुळे निराशेच्या छायेत गेलेल्या स्वप्नीलने नुकतीच आत्महत्या केली. अजून असे किती स्वप्नीलचे बळी देणार असा सवाल करत फडणवीस आणि मुनगूंटीवार यांनी सरकारला वेठीस धरले. एमपीएससी परीक्षेच्या धडमुसळे कारभारामुळे आज अनेक विद्यार्थी निराश झाले आहेत. सरकार विद्यार्थ्याच्या व्यथा ऐकत नाही आणि अशी कार्यपद्धती उपयोगाची नाही. असे फडणवीस यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षापासून नियुक्त्या रखडल्या आहेत. नुसती आंदोलने होतात. पण त्यातून निष्पन्न काही होत नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. सुधीर मुनगुंटीवार यांनी स्वप्नीलच्या कुटूंबियांना ५० लाखाची मदत द्यावी असे आवाहन केले. तसेच आजची एमपीएससची परिस्थिती सांगताना आजपर्यंत ४३० विद्यार्थी आत्महदन करण्याच्या मार्गावर असून १०० विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तोडगा काढण्याची विनंती केली. 
 
 
स्वप्नीलच्या कुटूंबियांना मदत करण्याबाबत सरकार सकारात्मक- उपमुख्यमंत्री अजित पवार
विरोधकांच्या प्रश्नांना फत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की, स्वप्नीलची आत्महत्या ही वेदनादायी घटना आहे. सरकार स्वप्नीलच्या कुटूंबियांना मदत करण्याबाबत सकारात्मक आहे. त्याचबरोबर ३१ जुलै पर्यंत सर्व रिक्त जागा भरण्याची मोठी घोषणा सरकारकरडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर कुठल्याही विद्यार्थ्यांवर अशी वेळ येऊ देणार नाही, असंही अजित पवार यांनी नमूद केलं. कोरानामुळे परीक्षा, मुलाखती लांबल्या. पण आता लवकरच यावर चर्चा करु असंही अजित पवार यांनी सांगितलं. 
 
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा