पाकिस्तानी दहशतवादी संघटनांशी आमचा संबंध नाही, तालिबान चे स्पष्टीकरण

काबुल, १९ जुलै २०२१: अफगाणिस्तानात एक एक करून शहरे ताब्यात घेत असलेल्या तालिबानने पाकिस्तानी दहशतवादी संघटनांशी असलेले संबंध स्पष्ट केले आहेत. तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन म्हणाले की, पाकिस्तानमध्ये वाढणार्‍या लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांशी त्यांचा संबंध नाही. लष्कर, जैश-ए-मोहम्मद यासारख्या संघटनांना अफगाणिस्तानचा वापर इतर देशांविरूद्ध वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही, असा दावा सुहेल शाहीन यांनी केला.

‘पाक दहशतवाद्यांशी कोणताही संबंध नाही’

डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीत तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी म्हटलं आहे की, त्यांचा पाकिस्तानमधील संघटनांशी कोणताही संबंध नाही. काही दिवसांपूर्वी आलेल्या अहवालात असा दावा करण्यात आलाय की, पाकिस्तानच्या अतिरेकी आणि गुप्तहेर संस्था तालिबानांशी युद्ध लढत आहेत. पाकिस्तानच्या हैदराबादमध्ये तालिबानी सैन्य प्रशिक्षण घेत असल्याचा दावाही करण्यात आला.

गनी यांनी केला पाकिस्तानकडे इशारा

अफगाणचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांच्या एका वक्तव्यामुळं या अहवालाला बळकटी मिळालीय, ज्यात त्यांनी पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील संबंधांकडं लक्ष वेधलं आहे. अफगाणिस्तानावर निष्ठा असेल तर ते ड्युरंड लाइन स्वीकारणार नाहीत असेही त्यांनी तालिबान्यांना सांगितलं. ही सीमा ब्रिटनने दोन्ही देशांदरम्यान तयार केली होती, जी अफगाणिस्थान स्वीकारत नाही.

भारताने निपक्ष राहावं

भारताच्या प्रतिनिधींशी भेट घेण्याची चर्चाही शाहीन यांनी फेटाळून लावलीय. या मुद्यावर भारत न्याय्य होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्याचा दावाही केला आहे. इस्लामच्या नियमांच्या आधारे महिलांना शिक्षणाचे आणि कामांचे स्वातंत्र्य मिळेल असे शाहीन म्हणतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा