सोनिया गांधींसह आज होणार १५ विरोधी पक्षांची बैठक; उधव ठाकरे, शरद पवार राहणार उपस्थित

नवी दिल्ली, २० ऑगस्ट २०२१: केंद्राविरुद्ध विरोधी एकजूट दाखवण्यासाठी १५ पक्ष शुक्रवारी (आज) संध्याकाळी व्हर्च्युअल बैठक घेतील. ही बैठक काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावली आहे. विशेष बाब म्हणजे या बैठकीत आम आदमी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीला कोणतेही आमंत्रण पाठवण्यात आलेले नाही.

सोनिया गांधींनी बोलावलेल्या या बैठकीला बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षांचे मोठे नेते उपस्थित राहतील. असे सांगितले जात आहे की, कॉंग्रेस व्यतिरिक्त १४ विरोधी पक्षांचे नेते विरोधी एकजूट दाखवण्यासाठी सहभागी होतील.

विरोधी नेते ठराव संमत करू शकतात

सूत्रांनी सांगितले की, या बैठकीत एक संयुक्त निवेदन किंवा ठरावही मंजूर केला जाऊ शकतो. हा प्रस्ताव कोरोना महामारी दरम्यान मोदी सरकारच्या कामगिरीचे गंभीर मूल्यांकन असेल. सूत्रांनी सांगितले की, यामध्ये पावसाळी अधिवेशनात संसदेचे कामकाज, कोरोना लसीकरण, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि अर्थव्यवस्था समाविष्ट केली जाईल.

विरोधी एकजूट मजबूत करणे हे ध्येय

नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनानंतर विरोधी एकजूट आणखी मजबूत करणे हा या बैठकीचा उद्देश आहे. चार आठवडे चाललेल्या या अधिवेशनात राज्यसभेत काँग्रेस पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांचा नवा समन्वय दिसून आला. त्याचवेळी, दोन्ही सभागृहात विरोधकांना एकत्र करण्यासाठी राहुल गांधींच्या उपस्थितीला चालना मिळाली.

यापूर्वी ९ ऑगस्ट रोजी काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित केले होते. मात्र, गांधी कुटुंबातील सदस्यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. अशा स्थितीत सोनिया गांधींच्या या सभेकडे प्रतिवाद म्हणून पाहिले जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा