पुण्यातील अकरावी प्रवेशाची अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी आज होणार जाहीर

17

पुणे, २५ ऑगस्ट २०२१ : नुकतेच दहावीचे निकाल लागले त्यानंतर अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरु झाली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडसह मुंबई, अमरावती, नाशिक, नागपूर महापालिका क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यानुसार २५ ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

यंदा पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतल्या ३१० महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी १ लाख ११ हजार १२५ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी ७७ हजार २८५ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीसाठी अर्जाचा पहिला आणि दुसरा भाग भरण्यासाठी विद्यार्थ्यांना रविवारपर्यंतची मुदत देण्यात आली होती. सोमवार आणि मंगळवारी या अर्जांवर प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर बुधवारी अकरावी प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल.

अशी असेल पुढील प्रक्रिया

२७ ऑगस्ट सकळी १० वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार

विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत कॉलेज मिळणार

पहिल्या यादीनंतर कॉलेजचे कट ऑफ संकेतस्थळवर जाहीर होणार

२७ ऑगस्ट सकाळी १० ते ३० ऑगस्ट सायंकाळी ६ वाजेपर्यंत

विद्यार्थ्यांना आपल्याला मिळालेले पसंतीचे कॉलेज निश्चित करायचे आहे

अन्यथा पुढील फेरीसाठी पर्याय उपलब्ध असेल

३० ऑगस्ट रात्री १० वाजता दुसऱ्या गुणवत्ता यादी साठी उपलब्ध जागा संकेतस्थळावर जाहीर केल्या जातील.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ईश्वर वाघमारे