नवी दिल्ली, ३० ऑगस्ट २०२१: टोकियो पॅरालिम्पिक -२०२० मध्ये भारताच्या खात्यात आणखी एक पदक आले आहे. पॅरा धावपटू निषाद कुमारने रविवारी पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. निषाद कुमारने पहिल्याच प्रयत्नात २.०२ मीटर उडी मारली. दुसऱ्या प्रयत्नात त्याने २.०६ मीटर उडी मारली.
सुवर्णपदक अमेरिकेच्या रॉडरिक टाऊनसेंडने पटकावले आहे. रौप्य पदक अमेरिकेच्या डॅलस वाइज आणि निषाद कुमारने मिळवले. निषाद कुमार आणि डॅलस वाइजची सर्वोत्तम उडी २.६ मीटर होती.
या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी निषाद कुमार यांचे ट्विट करून अभिनंदन केले आहे. त्यांनी लिहिले की, टोकियोहून आणखी एक आनंदाची बातमी आली आहे! निषाद कुमारने पुरुषांच्या उंच उडी टी -४७ मध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल खूप आनंद झाला. उत्कृष्ट कौशल्य आणि चिकाटी असलेला तो एक उल्लेखनीय खेळाडू आहे. त्यांचे अभिनंदन.
टोकियो पॅरालिम्पिकमधील भारताचे हे दुसरे पदक आहे. टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने पहिले पदक पटकावले. तिने रौप्य पदकावर कब्जा केला.
निषाद कुमार हे हिमाचल प्रदेशातील बदाऊन या छोट्याशा गावाचे रहिवासी आहेत. २०१९ मध्ये निषादने दुबईत आयोजित वर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्स ग्रँड फ्रीमध्ये २.०५ मीटर उंच उडी मारून सुवर्णपदक जिंकण्याबरोबरच टोकियोचे तिकीट मिळवले होते. यानंतर, निषादने फेब्रुवारी २०२१ मध्ये आपली प्रतिभा सुधारताना दुबईतच २.०६ मीटर उंच उडी मारून नवीन विक्रम प्रस्थापित केला.
भाविनाबेन पदक जिंकणारी दुसरी महिला खेळाडू
रविवारी टेबल टेनिस क्लास ४ स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भाविनाबेन पटेलला जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या चीनच्या झोउ यिंगकडून ०-३ असा पराभव स्वीकारावा लागला. पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी दुसरी भारतीय महिला खेळाडू भाविनाबेन यशस्वी झाली.
पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया (पीसीआय) च्या वर्तमान अध्यक्षा दीपा मलिक पाच वर्षापूर्वी रिओ पॅरालिम्पिकमध्ये शॉट पुटमध्ये रौप्य पदकासह पॅरालिम्पिक गेम्समध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे