Realme चा पहिला टॅबलेट भारतात ९ सप्टेंबरला होणार लॉन्च

पुणे, ७ सप्टेंबर २०२१: Realme Pad ला भारतात ९ सप्टेंबर रोजी लॉंच करण्यात येणार आहे ही माहिती कंपनीने दिली आहे. कंपनीचा हा भारतातील पहिला टॅबलेट असेल. हा टॅबलेट ९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता लॉन्च करण्यात येणार आहे. Realme Pad चा जो फोटो समोर आला आहे त्यावरून असे वाटत आहे की तो जवळजवळ iPad Pro सारखाच दिसत आहे. कंपनीच्या वतीने या टॅबलेट ची काही वैशिष्ट्ये देखील सांगण्यात आले आहेत.
रियलमी ने प्रेस नोट जाहीर करत आणि ऑफिशिअल वेबसाईट च्या माध्यमातून हे सांगितले आहे की, Realme Pad ला भारतात ९ सप्टेंबर रोजी लॉंच करण्यात येईल. कंपनी यासाठी एक वर्च्युअल इव्हेंट देखील आयोजित करणार आहे. या इव्हेंटची लाईव्ह स्ट्रीमिंग यूट्यूब चैनल आणि फेसबुक द्वारे प्रसारित केली जाईल. विशेष म्हणजे कंपनीचा हा पहिलाच टॅबलेट असेल.
कंपनीने कळवले आहे की Realme Pad 6.9mm जाडीसह येईल.  तसेच, असे दिसते की त्याला 3.5 मिमी हेडफोन जॅकसह कर्व कॉर्नर मिळतील.  लीकमधून हे उघड झाले की रिअलमी पॅडमध्ये अल्युमिनियम युनिबॉडी कंस्ट्रक्शन असू शकते आणि हा टॅबलेट गोल्ड आणि ग्रे रंगाच्या पर्यायांमध्ये येऊ शकते.
तसेच लीकमधून हे उघड झाले की या टॅब्लेटला 10.4-इंच डिस्प्ले, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि स्टायलस मिळेल.  हे देखील सांगितले गेले आहे की त्याच्या समोर आणि मागच्या बाजूला एकच कॅमेरा दिसेल.  8MP सेन्सर रिअलमी पॅडच्या पुढच्या आणि मागील बाजूस दिसू शकतो.
९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात Realme Cobble Bluetooth speaker देखील लॉन्च केला जाईल याची माहिती कंपनीने आपल्या वेबसाइटवर दिली आहे.  या स्पीकरची वैशिष्ट्ये वेबसाईट वर सांगितली गेली आहेत.  हा स्पीकर 5W ऑडिओ आउटपुट, ९ तास बॅटरी बॅकअप, काळा आणि निळा रंग पर्याय, IPX5 वॉटर रेझिस्टन्स, गेमिंग मोड आणि रियालिटी लिंक ॲप सपोर्टसह येईल.
यापूर्वी कंपनीने असेही सांगितले होते की Realme 8s 5G आणि Realme 8i स्मार्टफोन ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात लाँच केले जातील.  Realme 8s स्मार्टफोन Dimensity 810 प्रोसेसरसह येईल.  त्याचबरोबर 8i हेलीओ G96 प्रोसेसरसह येईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा