पंतप्रधान मोदी 3 दिवसांच्या दौऱ्यावर अमेरिकेत दाखल, आज घेणार कमला हॅरिस यांची भेट

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले आणि भारतीय वेळेनुसार सकाळी 3.40 च्या सुमारास वॉशिंग्टनला पोहोचले. या महत्त्वाच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतील.

जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी वॉशिंग्टनमधील जॉईंट बेस अँड्र्यूज येथे उतरले, तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या भारतीयांनी मोठ्या संख्येनं तिरंगा फडकवून जोरदार स्वागत केलं. लोक मोदी-मोदीचा जयघोष करत होते. एअरबेसवरून पीएम मोदींची टीम पेनसिल्व्हेनिया अव्हेन्यूवरील हॉटेल विलार्ड येथे जाईल.

पंतप्रधान मोदींचा आजचा कार्यक्रम

दोन वर्षात पीएम मोदींचा हा पहिला अमेरिका दौरा आहे, ज्यात तिथली सत्ताही बदलली. पंतप्रधान मोदी उद्या व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी पहिली वैयक्तिक द्विपक्षीय चर्चा करतील, त्यानंतर क्वाड लीडर समिट होईल.

पीएम मोदी आज गुरुवारी क्वालकॉम (Qualcomm), एडोब (Adobe), फर्स्ट सोलर, जनरल एटॉमिक्स आणि ब्लॅकस्टोन या पाच मोठ्या कंपन्यांच्या सीईओंना भेटतील. यानंतर, ते 11 वाजता (IST) विलार्ड हॉटेलमध्ये ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची भेट घेतील.

यानंतर, पंतप्रधान मोदी आयझेनहॉवर कार्यकारी कार्यालयासाठी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिसला भेटण्यासाठी सुमारे साडेबारा वाजता (IST) रवाना होतील. शनिवारी, पीएम मोदी UNGA च्या 76 व्या सत्राला संबोधित करतील.

प्रवास करताना फोटो पोस्ट केला

अमेरिकेत पोहचण्यापूर्वी पंतप्रधानांनी विमानाच्या आत एक छायाचित्र पोस्ट केलं ज्यात ते काही महत्त्वाच्या फाईल्स वाचत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: चं एक छायाचित्र पोस्ट करत लिहिलं, ‘लांब उड्डाण म्हणजे कागदपत्रं आणि काही फाईलच्या कामातून जाण्याची संधी.’ अमेरिकेत मुक्काम करताना पंतप्रधान मोदी द्विपक्षीय चर्चा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत क्वाड कॉन्फरन्स तसेच UNGA मध्ये भाषण देतील.

अमेरिका दौऱ्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “22-25 सप्टेंबरच्या माझ्या अमेरिका दौऱ्यादरम्यान, मी अध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत भारत-अमेरिका व्यापक वैश्विक धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेईन आणि प्रादेशिक आणि जागतिक समस्यांवर विचारांची देवाणघेवाण करीन. परस्पर हित मी शेअर करेन.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा