चीनचं सैन्य उत्तराखंडमध्ये झालं होतं दाखल, केली पुलाची तोडफोड

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2021: लडाखच्या पूर्व भागात वाद झाल्यानंतर चीनने आता उत्तराखंडमध्ये अवैध्य कृत्यौ केलंय.  वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, चिनी सैन्याचे 100 हून अधिक सैनिक सीमा ओलांडून भारतात दाखल झाले होते.  हे सैनिक उत्तराखंडच्या बाराहोटी परिसरात शिरले होते.  रिपोर्ट्सनुसार, या चीनी सैनिकांनी पायाभूत सुविधांचंही नुकसान केलं आहे.
वृत्तानुसार, ही घटना 30 ऑगस्टची आहे.  हे चिनी सैनिक भारताच्या सीमेच्या आत पाच किलोमीटर आत शिरले होते आणि त्यांच्याकडं 50 पेक्षा जास्त घोडे होते.  या घुसखोरीच्या काही तासांनंतर, चिनी सैनिक उत्तराखंडच्या बाराहोटी भागातून परत आले होते.  इकॉनॉमिक टाइम्सच्या एका अहवालानुसार, टुन जून ला पास ओलांडल्यानंतर, 50 हून अधिक घोड्यांसह 100 हून अधिक चीनी सैनिक पाच किलोमीटरहून अधिक भारतीय हद्दीत पोहोचले.  या सैनिकांनी परत येण्यापूर्वी या भागात असलेल्या पुलावर हल्ला करून तोडून टाकल्याचा दावाही अहवालात करण्यात आलाय.  या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदी सरकारवर निशाणा साधलाय.
 चीनने या भागात आधीच केलीय घुसखोरी
या ठिकाणी इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) चे जवान तैनात आहेत.  माहिती मिळताच भारतीय सैनिकांनीही या भागात गस्त घातली.  अहवालांनुसार, दोन्ही देशांच्या सीमेच्या रचनेमध्ये संदिग्धता आहे, ज्यामुळं बाराहोटीमध्ये उल्लंघनाच्या घटना घडत आहेत.  तथापि, 30 ऑगस्टला सीमा ओलांडून आलेल्या चीनी सैनिकांच्या संख्येमुळं भारतीय अधिकारी चकित झाले.  यापूर्वीही, सप्टेंबर 2018 मध्ये, चिनी सैन्याने या भागात एकापेक्षा जास्त वेळा घुसखोरी केल्याच्या बातम्या आल्या होत्या.  चीनने LAC जवळ पायाभूत सुविधांच्या विकासालाही गती दिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा