पाकिस्तानमध्ये भूकंपाचे जोरदार हादरे, किमान 20 ठार, 200 जखमी

हर्नेई, 7 ऑक्टोंबर 2021: पाकिस्तानमध्ये गुरुवारी पहाटे भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. यामध्ये किमान 20 लोकांचा मृत्यू होण्याची भीती आहे, तर मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या हर्नेई भागात भूकंपाची तीव्रता 5.7 इतकी आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाचं म्हणजे रिश्टर स्केलवर 6 च्या आसपास भूकंपाची तीव्रता खूप जास्त मानली जाते आणि त्यातून लक्षणीय नुकसान होण्याची शक्यता असते. पाकिस्तानात झालेला भूकंप हा याच तेवृतेचा होता. म्हणजेच 5.7 तेवरतेचा हा भूकंप होता.

पाकिस्तानमध्ये पहाटे तीनच्या सुमारास हा भूकंप झाला, त्यानंतर खळबळ उडाली. घरात आरामात झोपलेल्या लोकांनी घाईघाईने बाहेर पडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. याशिवाय भूकंपामुळे अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. त्याचवेळी, आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की मृतांची संख्या आणखी वाढू शकते.

राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी सुहेल अन्वर हाश्मी यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, छत आणि भिंती कोसळून अनेक बळी गेले. त्याचवेळी सरकारचे मंत्री मीर झिया उल्लाह म्हणाले की, भूकंपामुळे 20 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आम्हाला मिळत आहे. बचावकार्य सुरू आहे.

या भागाच्या उपायुक्तांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, भूकंपामध्ये किमान 200 लोक जखमी झाले आहेत आणि मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. भूकंपानंतर सोशल मीडियावर अनेक छायाचित्रे समोर आली आहेत. भूकंपाच्या धक्क्यानंतर लोक रस्त्यावर येताना दिसत आहेत. शक्तिशाली भूकंपानंतर पाकिस्तानमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा