११ ॲाक्टोबर महाराष्ट्र बंदची हाक

मुंबई, १० ऑक्टोंबर २०२१ : लखीमपूर मध्ये झालेल्या शेतकरी हिंसाचाराचे पडसाद केवळ उत्तरप्रदेशतच नाही तर महाराष्ट्रात देखील पडले आहेत. ज्याचाच परिणाम म्हणून ११ ॲाक्टोबरला सर्व व्यापी महाराष्ट्र बंदची हाक समस्त शेतकऱ्यांनी दिली आहे. भाजप मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याने शेतकऱ्यांवर गाडी घातली. त्यात अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला. त्याचेच प्रतिउत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीने बंद पुकारला आहे. हिंसाचाराचा निषेध आणि शेतकऱ्यांना पाठिंब्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीने या बंदात उतरणार आहे. मात्र जरी हा बंद हिंसाचाराच्या विरोधात असला तरीही बंद शांततेत पार पाडण्याचं शरद पवारांनी आवाहन केलं आहे. यावेळी अत्यावश्यक सेवा सोडून बाकी सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. यात किराणा ,भाजीपाला, दूध या अत्यावश्यक गोष्टींची दुकाने उघडी राहतील. त्याचबरोबर वैद्यकिय सेवा, मेडिकल सुरु राहतील. मात्र मुंबई आणि पुणे येथील व्यापारी या बंदमध्ये सहभागी होणार नाहीत. तसेच चित्रपट आणि सिनेमा यांचे शूटिंग सुरु ठेवण्यास विरोध झाल्यामुळे ते मात्र सुरु राहणार आहे. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट आणि पुण्यातील मार्केट यार्ड भाजीबाजार बंद राहणार आहे. त्याचा भाजीपुरवठ्यावर नक्कीच परिणाम जाणवेल.

ही बंदचा रुपरेषा असली तरी उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांविषया मविआला का पुळका आलाय? असा सवाल जनतेकडून होत आहे. महाराष्ट्रातला शेतकरी आधी कोरोना, मग ओला दुष्काळाने त्रासलेला असताना हे सरकार त्यांच्याविषयी पाषाण ह्रदयी कसे असा सवाल महाराष्टातले शेतकरी करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस, मुंबई

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा