उस्मानाबाद,१७ सप्टेंबर २०२० : सोयाबीन बियाणे साठवणूक आणि बियाणे जपणूकीतून शेतकरी आत्मनिर्भर व्हावा यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात दरवर्षी वाढत जाणारे सोयाबीन पिकाच्या लागवडीचे क्षेत्र लक्षात घेता सोयाबीन बियाणांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि गावातच सोयाबीन बियाणे उपलब्ध व्हावं यासाठी कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील २८२ गावातल्या बारा हजार सहाशे नव्वद महिला-पुरुष शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचे बियाणे जपून ठेवण्यासंदर्भात शेतीशाळामधून मार्गदर्शन केले जात आहे.
कृषी विभागाकडून सोयाबीन पिकाची काढणी, मळणी, साठवणूक, उगवण क्षमता तपासणी करण्याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे.
गावोगावी शेतकऱ्यांची आर्थिक बचत होणार असून शेतकरी सोयाबीन बियाण्यांच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी