मुंबई: राज्यातील निवडणुकांचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला. अशातच राज्यात अद्यापही सरकार स्थापन करण्यात कोणत्याही पक्षाला यश आलं नाही. त्यातच राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. अशातच राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटेल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. उद्या दुपारपर्यंत राज्यातील सत्तास्थापनेबाबत चित्र स्पष्ट होईल, असं मोठं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं.
सरकार स्थापनेतील सर्व विघ्न दूर झाली आहेत. राज्यातील राष्ट्रपती शासन दूर करण्यासाठी काही कायदेशीप बाबींमधून जावं लागतं. तसंच राज्यपालांना बहुमताचा आकडा पुरव्यांनीशी द्यावा लागतो. ती प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल आणि डिसेंबर महिना उजाडेपर्यंत सरकार स्थापन होईल, येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये सत्ता स्थापनेची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तसंच डिसेंबर महिना उजाडण्यापूर्वी राज्यात सरकार स्थापन होईल आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री विराजमान होईल, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं.