समीर वानखेडे यांच्यावरील लाचखोरीच्या आरोपांची चौकशी मुंबई पोलिस करणार, 4 अधिकाऱ्यांची नियुक्ती

5
मुंबई, 28 ऑक्टोंबर 2021: एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याविरुद्धच्या चार लाचखोरीच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी चार अधिकाऱ्यांची नियुक्ती केलीय.  अतिरिक्त पोलिस आयुक्त दिलीप सावंत तपास पाहणार आहेत.
प्रभाकर सेलने समीर वानखेडे, सुधा द्विवेदी, कनिष्क जैन आणि नितीन देशमुख यांच्याविरुद्ध लाचखोरीच्या चार तक्रारी दाखल केल्या आहेत.  पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बुधवारी याबाबतचे आदेश जारी केले.
 एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, मुंबई पोलिसांनी समीर वानखेडेविरोधात दाखल केलेले चारही अर्ज “क्लब” केले आहेत.  चारही अर्जांवर माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात मार्किंग करण्यात आल्याचं अधिकाऱ्याने सांगितले.
 लाचखोरीच्या चार वेगवेगळ्या तक्रारी
आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध प्रभाकर सेल, सुधा द्विवेदी, कनिष्क जैन आणि नितीन देशमुख यांच्याकडून  ‘लाचखोरीच्या’ चार वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
चार तक्रारदारांपैकी एक प्रभाकर सेल हा आर्यन खान प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा (NCB) स्वतंत्र साक्षीदार आहे.  गेल्या आठवड्यात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात, प्रभाकर सेलने दावा केला आहे की आणखी एक स्वतंत्र साक्षीदार, केपी गोसावी आणि सॅम डिसोझा यांनी बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटी रुपयांच्या ‘पे-ऑफ’ योजनेवर चर्चा केली.
 या रकमेपैकी 8 कोटी रुपये आर्यन खान प्रकरणातील प्रभारी अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडं जायचे होते, असा दावा प्रभाकर सेलने केलाय.
या महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचं सांगितलं होतं.  राष्ट्रवादीचे नेते मलिक यांनी मंगळवारी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचीही भेट घेऊन चर्चा केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा