पुणे, 6 डिसेंबर 2021: पुण्या मध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून धुके पडताना दिसत आहे. शुक्रवारी सकाळी शहराची दृश्यमानता 1,000-2,000 मीटरपर्यंत घसरली होती, त्यानंतर काल ही पुण्यात सकाळ धुकं दाटून आल्याचं दिसलं. धुकं शनिवारपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे, असं आयएमडी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितलं होतं. असं असताना देखील रविवारी देखील शहरात दाट धुकं दिसलं
शुक्रवारी पुण्यात 8.3 मिमी पाऊस झाला, परंतु त्यानंतर दोन दिवस पाऊस पडला नाही. वरिष्ठ IMD शास्त्रज्ञ आणि हवामान संशोधक के.एस. होसळीकर यांनी सांगितलं की, “अशा हवामानाच्या स्थितीत पाऊस, धुक्याची सकाळ अंदाजानुसार एक-दोन दिवस राहण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर पुण्यात फक्त अंशतः ढगाळ वातावरण शक्यता आहे.”
गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी पुण्यात जोरदार पाऊस झाला. आणि त्यापाठोपाठ कडाक्याची थंडी देखील पुण्यात अनुभवायला मिळाली. या परिस्थितीमुळं पुण्यातील अनेक भागात सकाळच्या वेळेस हवेतील आर्द्रतेमुळं धुक्याचं वातावरण तयार झाले. मात्र अशा वातावरणाचा अनेक पुणेकरांनी आनंद घेतला. अनेक जणांनी सोशल मीडियावर फोटो देखील शेअर केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे