भेसळयुक्त जिऱ्यापासून सावधान…!

अलीकडच्या काळात कशा कशात भेसळ होईल याचा काही नेम नाही. भेसळ सुध्दा इतक्या हुशारीने केली जाते की, खर कुठलं आणि खोटं कुठलं काही समजत नाही. आता तर नकली जिऱ्याचा धंदाही चांगलाच वाढत आहे. त्यातच दिल्लीत पहिल्यांदा नकली जिऱ्याचा साठा पकडला. जिऱ्यातही भेसळ होऊ शकते. हे ऐकून धक्का बसला ना.

नकली जिरे हे जंगली गवत, गूळाचं पाणी आणि दगडांची पावडर मिळून तयार केलं जाते. जे आरोग्यासाठी चांगलंच नुकसानकारक आहे. नकली जिऱ्याच्या सेवनाने केवळ स्टोनचाच नाही तर याचं नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्तीही कमजोर होते. तसेच कॅन्सरचाही धोका होतो.

डॉक्टरांच्या मते, ही भेसळ फार घातक आहे आणि सामान्य लोकांच्या जीवनासोबत खेळणे झाले आहे. हे लगेच थांबवले गेले पाहिजे. न्यूट्रिशननिस्ट डॉक्टर अनिता लांबा यांनी नवभारत टाइम्सला सांगितले की, ज्याप्रकारे हे जिरे तयार केलं जाते किंवा त्यात ज्या गोष्टी मिश्रित केल्या जातात त्याने स्टोनचा धोका अधिक आहे. तसेच याने रोगांसोबत लढण्याची क्षमताही कमी होते. त्यांनी सांगितले की, मनुष्याचे शरीर भेसळयुक्त पदार्थ खाण्यासाठी तयार झालेले नाही. तसेच दुसऱ्या तज्ञ डॉक्टरांनी सांगितले की, या जिऱ्याने कॅन्सर होऊ शकतो किंवा त्वचेसंबंधी आजारही होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला जिरे ओळखता येणे खूप गरजेचे आहे.

कसं तयार केले जाते नकली जिरे…
हे जिरे तयार करण्यासाठी एक खास प्रकारचं गवत वापरले जाते. ते गुळाच्या पाण्यात मिश्रित करून सुकवले जाते. याने गवताचा रंग जिऱ्याच्या रंगासारखा होतो. नंतर जिऱ्याला चमक आणि ठोस करण्यासाठी त्यात दगडाची पावडर मिश्रित केली जाते. हे प्रामुख्याने गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये अनेक महिन्यांपासून सुरू आहे. इथून देशातील इतर भागांमध्ये हे जिरे पाठवले जात आहे.

कशी पटवाल नकली जिऱ्याची ओळख?
नकली जिऱ्याची ओळख पटवण्यासाठी एका वाटीमधे पाणी घ्या. हे जिरे पाण्यात टाकल्यावर काही वेळाने विरघळू लागते. त्याचा रंग जातो. तेच ओरिजनल जिरे पाण्यात टाकल्यानंतरही विरघळत नाही.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा